Add new comment

बीड: धक्कादायक आयसोलेशन वार्डात स्वॅब घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू ; आता रिपोर्टची प्रतिक्षा

बीड दि.22 ( सिटीझन ) येथील 
जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये दाखल झालेल्या एका व्यक्तीचा स्वॅब घेतल्यानंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज पहाटे घडली. सदरील रुग्णाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे आता स्वॅबचा रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आष्टी तालुक्यातील एका रुग्ण रात्री जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात दाखल झाला. कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेतल्यानंतर तासाभरात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. आता त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. सदरील रुग्ण हा बऱ्याच दिवसांपासून आजारी असून त्यास अनेक आजार आहेत असे समजते. यापुर्वी आष्टी, अहमदनगर येथे दवाखान्यात उपचार करण्यात आले. मात्र आष्टीत आल्यानंतर त्यास श्वास घेण्यास त्रास होत असल्याने बीड येथे आणण्यात आले. येथे आयसोलेशन वार्ड मध्ये दाखल करुन घेण्यात आले. रात्री 9 च्या सुमारास कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेतला यानंतर तासाभरात सदरील रुग्णाचा मृत्यू झाला. आता  अहवालाकडे लक्ष लागले असून त्यानंतर खरे कारण समजू शकेल.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.