बीडमधील मोमीनपुरा, सावता माळी चौकातील ठराविक गल्ल्या पूर्णपणे लॉकडाऊन

बीड दि.20 ( सिटीझन ) बीड शहरात कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्यानंतर हे रुग्ण ज्या भागातील होते, त्या गल्ल्या कंन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या भागातील ठराविक गल्यांमध्ये आजपासून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णपणे बंद ठेवून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढलेल्या आदेशाद्वारे शहरातील मोमीनपुरा, अशोकनगर भागातील गफुरमिस्त्री यांच्या घरापासून बीलालभाई बरतनवाले यांच्या घरापर्यंतचा परिसर तर जय भवानी नगर, सावतामाळी चौक परिसरात बाबुराव दुधाळ यांच्या घरापासून ते कुंडलिक खांडे यांच्या घरापतर्यंतचा परिसर कंन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णत: बंद राहणार आहे. दरम्यान या कालावधीत हा भाग पूर्णपणे लॉकडाऊन असणार आहे. नागरिकांनीही या आदेशाचे पालन करावे. कोणीही घराबाहेर पडू नये. जीवनावश्यक वस्तू घरात असतातच त्यामुळे कोणीही बाहेर न येता आपली काळजी घ्यावी.
Add new comment