बीड जिल्ह्यात काय सुरू वाचा मात्र 10 मे पासून किराणा दुकान पूर्ण बंद, app घ्यावा लागणार ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
कपडे, चप्पल - बूटची दुकाने सहा दिवसाआड
गॅरेज एक दिवसआड सकाळी 7 ते 9.30
स्टेशनरी 13 दिवसात केवळ दोनवेळा
कटिंगची दुकाने बंदच, घरपोहच करता येणार
बीड दि.4 ( सिटीझन ) केंद्र सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्यानंतर राज्य सरकारने नवीन निर्देश जारी केलेले आहेत. आता बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीही जिल्ह्यासाठी आज पहाटे 1 वाजुन 51 मिनिटांनी नवीन आदेश काढला आहे. त्यामध्ये जिल्ह्यात विषम तारखेला म्हणजेच एकदिवसा आड सकाळी 7 ते 9.30 या वेळेत सूट देण्यात आली आहे. कपडे, भांडे आणि चप्पल - बूटची दुकाने सहा दिवसा आड म्हणजे दि.5 ,11 आणि 17 मे रोजी सकाळी 7 ते 9.30 यावेळेत उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे.
बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज नवीन आदेश काढले आहेत. आदेशात म्हटले आहे की, 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. 17 रोजी रात्री 12 पर्यंत संचारबंदी व जमावबंदी कायम राहील. जिल्ह्यात काही उद्योगधंद्यांना सूट देण्यात आली आहे. मात्र यापूर्वी राबवण्यात आलेला सम-विषम तारखेचा फॉर्म्यूला कायम ठेवला आहे. तसेच संचारबंदी शिथिलतेची वेळही (सकाळी 7 ते 9.30) हीच ठेवण्यात आली आहे.
काय राहणार सुरू :- वेळ एक दिवसाआड सकाळी 7 ते 9.30
शिवणकाम, कुंभार, लोहार, चांभार, धोबी, प्रेस करणे, पेंटर, सुतार, इलेक्ट्रीशीयन, प्लंबर, भांगार व्यवसायिक, ऑडीटर, शेअर ब्रोकर, सी.ए., फॅब्रिकेशन, इलेक्ट्रीकल्स साहित्य, होम अप्लायन्सेस, फर्निचर दुकाने, बेकरी, ड्रायफ्रूट दुकाने, कन्फेक्शनरी, स्वीट मार्ट, मिठाई भांडार आदींना स्थानिक स्वराज्य संस्था (नगर परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत) यांची शिफारसपत्र घेऊन पास मिळवल्यानंतर काम सुरू करता येणार आहेत.
*ज्यांचे काम दुकानात किंवा कार्यालयात होते त्यांना एक दिवसाआड सकाळी 7 ते 9.30 यावेळेत दुकान उघडता येणार*
शिवाय ज्यांचे काम दुकानात किंवा कार्यालयात होते त्यांना आपले दुकान / कार्यालये विषम तारखेस सकाळी 7 ते 9.30 उघडता येणार आहेत. शिवाय वरील व्यवसायिकांशी संबंधित साहित्याची सर्व दुकाने विषम तारखेस सकाळी 7 ते 9.30 या कालावधीत उघडता येतील. ई-सेवा देणार्या कंपन्या, कोणत्याही वस्तूंच्या सेवा नियमाप्रमाणे देता येतील.
*खाजगी व शासकीय बांधकाम करता येणार
एक दिवसाआडच्या ( सकाळी 6.30 ते 10 वगळून )
बीड जिल्ह्यातील सर्व प्रकारचे खासगी व शासकीय बांधकामे विषम दिनांकास सकाळी 6.30 ते 10 ही वेळ वगळून इतर वेळात सुरू ठेवता येतील. मात्र रितसर पास मिळल्यानंतरच कामे सुरू करता येतील.
*जिल्ह्यातील सर्व गॅरेज एक दिवसाआड सुरु
( वेळ सकाळी 7 ते 9.30 )
बीड जिल्ह्यातील सर्व वाहन दुरुस्तीची दुकाने त्यासाठी लागणारे स्पेअर पार्टस्ची दुकाने विषम दिनांकास सकाळी 7 ते 9.30 या काळात उघडता येतील. मात्र यांना देखील दुकानाचा पास काढणे बंधनकारक असेल.
*कपडे, भांडे , चप्पल बूट दुकाने
6 दिवसाला उघडणार*
सर्व प्रकारचे कपडे, भांड्याची दुकाने, चप्पल दुकाने ही दि. 5, 11 व 17 मे रोजी सकाळी 7 ते 9.30 या वेळेत उघडे राहू शकतील.
*स्टेशनरी दुकान 13 दिवसात
दोनदाच उघडता येणार
शैक्षणिक पुस्तकांची दुकाने वगळता इतर सर्व पुस्तकांची व स्टेशनरीची दुकाने, कॉस्मेटिक्स, जनरल स्टोअर्सची दुकाने दि. 7 व 13 मे रोजी सकाळी 7 ते सकाळी 9.30 या वेळेत उघडी राहू शकतील, असे आदेशात नमूद केले आहे.
*कटिंग सेवा देता येणार *(सलून )दुकाने बंदच मात्र घरपोच
केश कर्तनालय चालक आणि ब्युटीपार्लर चालक यांना आपली दुकाने उडता येणार नाहीत मात्र ग्राहकांच्या घरी जावून दररोज पूर्णवेळ सेवा देता येणार आहे. यासाठी त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत यांच्याकडून शिफारसपत्र घेऊन पास मिळवणे बंधनकारक असेल, पास असेल तरच त्यांना ही सेवा देता येईल.
*10 मे नंतर किराणा दुकानांवरही बंदी; आता aap घ्यावा लागणार !
दि. 10 मेपर्यंत जिल्ह्यातील सर्व 11 शहरांमध्ये दुकानदार व नागरिकांनी ‘निडली’ हे होम डिलिव्हरी अॅप प्लेस्टोअरवरून डाऊनलोड करून घ्यावे आणि या अॅपद्वारे लागणार्या साहित्याची खरेदी होम डिलिव्हरी स्वरुपात जास्तीत जास्त प्रमाणात खरेदी करण्याचा प्रयत्न करावा. दि. 10 मेपासून 11 शहरांमधील कोणत्याही किराणा दुकानास विषम दिनांकास सकाळी 7 ते 9.30 या काळामध्ये सुद्धा उघडता येणार नाहीत, असे आदेशात म्हटले आहे.
*फळविक्रेत्यांना पूर्णवेळ परवानगी*
केवळ फळविक्रेत्यांना शेतकर्यांच्या शेतात जावून फळे खरेदी करून शहरामध्ये फिरून विकता येतील. तसेच कोणत्याही स्वरुपाचा होलसेल किंवा आडत बाजार न करता फळ विक्री करण्यास दररोज पूर्णवेळ परवानगी देण्यात आली आहे. मात्र सदरील फळ विक्रेत्यांना तालुकास्तरीय समितीकडून फळविक्री परवाना घेणे बंधनकारक असेल. शेतावर जावून खरेदी करून फळे व भाजीपाला तालुका किंवा जिल्ह्याबाहेर निर्यात करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
Add new comment