बीडमध्ये चक्क ॲम्बुलन्समधून प्रवाशी वाहतूक , गुन्हा दाखल
बीड दि.23 ( सिटीझन ) कोरोना साथीच्या संचार बंदी काळात रुग्ण नसलेल्या इसमांची प्रवाशी वाहतुक करणाऱ्या अॅम्बुलन्सवर कारवाई करण्यात आली आहे.
बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. भारत राऊत यांना दि.22 एप्रिल रोजी।गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाली की,बीड शहरातील काही अॅम्बुलन्स चालक रुग्ण नसलेले इसमांची गैरकायदेशीर प्रवासी वाहतुक करत आहे. दि.22 रोजी अॅम्बुलन्स गाडी क्रमांक MH-24-J-9254 चा चालक याने त्याच्या अॅम्बुलन्स मध्ये अवैधरित्या रुग्ण नसलेले इसमांची प्रवाशी वाहतुक करीत आहे व त्यांने त्याचे अॅम्बुलन्स मध्ये तेरवी लाईन धांडे गल्ली,बीड येथे एक महिला व तिचे दोन लहान मुले व तिचा भाऊ यांचे प्रवाशी भाडे घेवुन माजलगांव।येथे गेलेला आहे व तो काही वेळानंतर सरकारी दवाखाना जवळ येणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार बीडच्या सरकारीदवाखान्यासमोर सापळा लावला असता अॅम्बुलन्स क्रमांक MH-24-J-9254 हि तिथे आली तिला हात दाखवुन थांबवले चालकाचे नाव गांव विचारले असता त्यांने त्याचे नाव अशोक अभिमान लांडगे ( वय-30 रा.वडगांव गुंदा, ह.मु.लक्ष्मणनगर, बीड ) असे सांगितले व सदर
अॅम्बुलन्स माझे स्वत:चे मालकीची आहे असे सांगितले. त्याचे बाजुस बसलेल्या इसमाकडे विचारपूस केली असता तेरवी लाईन धांडे गल्ली,बीड येथील स्वत:च्या घरातुन अॅम्बुलन्स चालक यास 1600 रु.भाडे देवुन मी,माझी बहिण सानिया व तिचे दोन लहान मुले यांना आजारी नसताना आझादनगर माजलगांव येथे तिच्या पतीच्या घरी सोडुन परत आलो आहोत असे सांगितले. दि.22 रोजी सरकारी दवाखाना, बीड समोर अॅम्बुलन्स MH -24-J-9254 चा चालक नामे अशोकअभिमान
लांडगे याने सध्या जिल्हाधिकारी यांचे कोरोना-19 या विषाणुचा प्रार्दुभाव
रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा-1897 लागु केलेला असुन जिल्हयात संचारबंदी व जमावबंदी लागु असतानाही त्याने त्याच्या
अॅम्बुलन्समध्ये रुग्ण नसलेल्या चार व्यक्तीची प्रवाशी वाहतूक करुन जिल्हाधिकारी यांचे संचारबंदी आदेशाची अवज्ञा करुन
त्याच्या अशा कृत्यामुळे घातक अशा कोरोना रोगाचा प्रसार होवुन त्याचे स्वत:चे व इतरांचे जिवितास धोका होवु शकतो याची जाणीव
असतानाही त्यांने कोरोना रोगाचा प्रसार होईल अशी हयगईची व घातक कृती करुन वरील लोकांची प्रवाशी वाहतुक केलेली आहे. म्हणून
त्याचे विरुध्द पोस्टे बीड शहर येथे गु.र.नं. 105/2020 कलम 188,269,270 भादंवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
भविष्यात असे रुग्ण नसलेले प्रवाशी वाहतुक करणाऱ्या अॅम्बुलन्स वाहनावर पोलीस प्रशासना मार्फत बारकाईने लक्ष ठेवुन
कारवाई करण्यात येईल. सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सांवत, पो.नि.भारत राऊत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी सपोनि भास्कर नवले व स्थागुशा पोलीस कर्मचारी गोरक्षनाथ मिसाळ, पोशि-प्रदिप सुरवसे, आलिम शेख, गणेश हांगे ,विकी सुरवसे चालक जायभाये यांनी केलेली आहे.
Add new comment