बीड जिल्ह्यात आता ' Needly aap ' द्वारे अत्यावश्यक सेवा घरपोहच ; जिल्हाधिकारी यांची माहिती

 

बीड दि.2 ( सिटीझन ) लॉकडाऊन आणखी 2 आठवडे वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर काय सुरू होणार ? आणि कशात सूट मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी सध्या तरी जिल्ह्यात याबाबत नवीन निर्णय प्रशासनाने जाहीर केलेला नाही. मात्र जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यावश्यक सेवा घरपोहच मिळाव्यात यासाठी ' Needly aap ' तयार करण्याचे काम  सुरू असून हा aap प्ले स्टोअर मधून डाउनलोड करता येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी रेखावार यांनी स्वतः ही माहिती दिली आहे.

बीड जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा घरपोहच करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली ' नीडली app' तयार करण्याचे काम सुरू आहे. दुकानदार ते थेट ग्राहक ही संकल्पना त्या माध्यमातून राबविण्यात येत असून बाहेरची गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असावा असा अंदाज आहे. नीडली aap मध्ये सध्या किराणा दुकानांचा समावेश करण्यात आला असून हळूहळू अन्य प्रकारची दुकानेही या aap शी जोडण्यात येतील आणि त्यांच्या सेवाही घरपोहच देण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले.या संदेशाच्या माध्यमातून needly aap कसे घ्यावे,  ऑर्डर कशी नोंदवावी, प्रभागातील दुकानांची नावे, भावफलक,  याबरोबरच  त्यामधील महत्वाचे दुवे याचीही माहिती देण्यात आली आहे.यासंदर्भात विस्तृत माहिती प्रेस नोटच्या माध्यमातून देणार असल्याचेही जिल्हाधिकारी रेखावार यांनी स्पष्ट केले.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.