Add new comment

कोटा येथे अडकलेले बीडचे विद्यार्थी सुखरूप स्वगृही परतले

बीड दि.28 ( सिटीझन ) जिल्ह्यातील 55 ते 56 विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी कोटा ( राजस्थान ) येथे गेलेले होते. लॉकडाऊनमुळे हे सर्व विद्यार्थी त्याठिकाणी अडकले होते.हे विद्यार्थी आज दुपारी सुखरूप बीड शहरात दाखल झाले आहेत.

यासंदर्भात राज्य शासनाने दखल घेवून बीडसह राज्यातील इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्वगृही आणण्यासाठी प्रयत्न केले सुरू केले होते. जिल्हा प्रशासनानेही यासाठी पाठपुरावा केला होता. राज्य सरकारच्या परवानगी नंतर या विद्यार्थ्यांना त्या - त्या जिल्ह्यात आणण्यासाठी यंत्रणा कामाला लागली होती. आज दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास कोटा ( राजस्थान ) येथे अडकलेल्या बीडच्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यात आणण्यात आले. एका खाजगी ट्रॅव्हल्सने या विद्यार्थ्यांना बीड  बसस्थानकाच्या पाठीमागील रोडवर आणण्यात आले. याठिकाणी शिवाजीनगर पोलिसही दाखल झाले होते.  दरम्यान लॉकडाउनमुळे कोटा येथून अडकलेले विद्यार्थी परत आल्याने कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.