बीडमधील ही पाच रेशन दुकाने केली 'सस्पेंड', जिल्हा प्रशासनाचा दणका
बीड ( सिटीझन ) राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्ष्यात घेता महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्य लॉकडाऊन केले आहे. अश्या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेला धान्य पुरवठा करण्यासाठी रास्त भाव दुकानदारांना धान्य देण्यात आले आहे.
त्यांचा विषयी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
सदर तक्रारींची गंभीरपणे दखल घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी,बीड प्रकाश आघाव पाटील यांनी बीड तालुक्यातील एकूण पाच रास्त भाव दुकानांचे परवाने निलंबित केले आहे. व सदर निलंबित दुकाने नजीकच्या चांगल्या दुकानास जोडण्याबाबत तहसीलदार, बीड यांना आदेशीत केले आहे. निलंबित दुकानांमध्ये 1).रमेश सीताराम गंगाधर - बीड-41, 2)ज्ञानदेव कान्हू बांड - घोसापुरी, 3)चंद्रकांत रामभाऊ फाटले - बीड-34, 4 )चेअरमन फेअर प्राईस शॉप असोसिएशन - बीड-14, 5) चेअरमन फेअर प्राईस शॉप असोसिएशन - बीड-03 यांचा समावेश आहे.
Add new comment