द्वारकाधिशने दाखवला मनाचा मोठेपणा ! रोज ५०० लोकांच्या मोफत जेवणाची व्यवस्था
बीड (प्रतिनिधी):- येथील द्वारकाधिश मित्र मंडळाने मनाचा मोठेपणा दाखवत मदतीचा महायज्ञ सुरू केला आहे. दररोज ५०० लोकांच्या मोफत जेवणाची व्यवस्था घरपोहोच सुरू केली आहे.
बीड शहरातील परशुराम गुरखुदे व जगदीश गुरखुदे यांच्या द्वरकाधीश मित्र मंडळाने मदतीचा महायज्ञ सुरू केला आहे. गुरखुदे बंधुसह मित्र मंडळातील सर्व सहकार्यांनी एकत्र येवुन ५०० लोकांच्या जेवणाची मोफत व्यवस्था केली आहे. एकाच ठिकाणी ५०० लोकांचा स्वयंपाक रोज तयार केला जातो. पार्सल पॅक करण्यासाठीही अनेकजण झटत आहेत. सदरील जेवण घरपोहोच केले जात असुन या माध्यमातुन गुरखुदे बंधुंनी सामाजिक बांधीलकी जोपासली आहे.
पोलिसांनाही दोन वेळेचा चहा !
द्वाकराधीश मित्र मंडळाच्या मोफत जेवन व्यवस्थेचा आजचा ९ वा दिवस आहे. यासह गुरखुदे बंधुंनी कर्तव्यावर हजर असलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचार्यांसाठी दोन वेळेच्या चहाची मोफत आणि पोहोच व्यवस्था केली आहे. गुरखुदे यांच्याकडे असलेल्या म्हशींचे दुध यासाठी वापरण्यात येत आहे.
Add new comment