Add new comment

गेवराईतील ' त्या 'संशयित रुग्णाच्या संपर्कातील 31 जण क्वारंटाईन

 

गेवराई ( सिटीझन ) गेवराई तालुक्याच्या सीमेवरील गाव असलेल्या महारटाकळीत कोरोना संशयित रुग्ण आढळून आल्याने  खळबळ उडाली आहे. हा रुग्ण स्वतःहून गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आला होता. यावेळी येथील डॉक्टरांना रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून आज रविवारी सायंकाळपर्यंत त्याचा रिपोर्ट येण्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या संशयिताच्या संपर्कात आलेल्या तब्बल 31 जणांना तालुका प्रशासनाने क्वारंटाईन केल्याचे वृत्त आहे. यापैकी 21 जण कुटुंबातील तर अन्य 10 जण गावातील असून या सर्वांना ते राहत असलेल्या ठिकाणीच क्वारंटाईन केल्याचे समजते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम यांच्यासह आरोग्य पथक, चकलांबा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय देशमुख, या मंडळाचे मंडळ अधिकारी सुनील तांबारे यांनी महारटाकळी याठिकाणी जाऊन सदरील रुग्ण राहत असलेल्या भागाची पाहणी केली आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.