सुरेश नवलेची अवस्था शोलेच्या जेलर असरानी सारखी-किशोर उबाळे, जयसिंग चुंगडे

बीड - अध्ये इधर जाओ, अधे उधर जाओ बाकी मेरे पिछे ओओ हा गाजलेला डॉयलॉग शोले मधील जेलर असरणी चा आहे ज्याच्या मागे कुत्र नुसते तो शोले मधील जेलर असरणी असतो अशी अवस्था सध्या बीड मध्ये सुरेश नवले यांची झाली आहे, पाच वर्षे गायब राहणारे हे निवडणुकीच्या तोंडावर उगवत असतात, तोंडाची वाफ घालवत असतात, मागे कुत्र नसणारे हे बीड चे असराणी आता उगवले आहेत, वायफळ बडबड करत आहेत, असा आरोप शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख किशोर उबाळे व जिल्हा संघटक जयसिंग चुंगडे यांनी केला आहे

 

निवडणुकीच्या तोंडावर आघाडीचा धर्म पाळणाऱ्या माजी आमदार सुरेश नवले यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराबद्दल घणाघात केल्याचे सांगण्यात आले ना जयदत्त क्षीरसागर यांनी दहा वर्षात मतदारसंघाची वाट लावल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला गेल्या अनेक महिन्यापासून बीड शहरात झपाट्याने होत असलेली विकास कामे कदाचित सुरेश नवले यांना दिसत नसावीत, जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून शहराला कोट्यवधींचा निधी मिळाला आहे,ही कामे आजही चालू आहेत,नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी बीडमध्ये तर ना जयदत्त क्षीरसागर यांनी मतदारसंघात केलेल्या विकासाच्या पाऊलखुणा आजही ही दिसत आहेत मात्र पाच वर्षातून एकदा एखाद्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी किंवा सुपारी घेऊन तुतारी वाजवण्यासाठी बाहेर पडलेल्या सुरेश नवले यांना बीडचा विकास दिसलाच नाही शहरात सुरू असलेल्या विकास कामांची त्यांनी आधी माहिती घ्यावी आणि नंतरच बेताल वक्तव्य करावेत असा सवाल करत शिवसेना माजी जिल्हाप्रमुख किशोर उबाळे आणि जिल्हा संघटक जयसिंग चुंगडे यांनी सुरेश नवले यांचा चांगलाच समाचार घेतला,ज्याचा पक्ष कोणता हे बीडकरांनाच माहीत व  ज्यांच्या पक्षाची वाट लागली आहे अशांनी बीड शहराची वाट लागल्याचा आरोप करू नये असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.