लाइव न्यूज़
मराठवाडा दौर्यातून होणार नव्या ठाकरेंची एण्ट्री; मनसेचा असेल हा मास्टर प्लॅन
मुंबई, १५ जुलैः महाराष्ट्राचं राजकारण आणि त्यात ठाकरे कुटुंबियांचं असलेलं वजन याबद्दल सारेच जाणून आहेत. आता या राजकारणात ठाकरे कुटुंबियांतील अजून एक व्यक्ती दमदार एण्ट्री करायला सज्ज झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे राजकारणात लवकरच प्रवेश करणार आहेत. अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रवेशाबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा होत होती. मात्र अमित यांचा राजकारणातील श्रीगणेशा कधी होणार हे काही खात्रीपूर्वक सांगता येत नव्हते. पण पक्षातील नेत्यांच्या मागणीमुळे अमित यांच्यावर पक्षाची विशेष कामगिरी सोपवण्यात येण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या धर्तीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे १९ जुलैपासून मराठवाडा दौर्याची सुरूवात करणार आहेत. १९ जुलै ते २५ जुलैपर्यंत हा मराठवाडा दौरा असणार आहे. या दौर्यात राज यांच्यासोबत अमित ठाकरेही सहभागी होणार आहे. या दौर्यातून अमित राजकारणात प्रवेश करतील असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता अनेकांचे लक्ष या दौर्याकडे लागून राहिले आहे. औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीड असा चार जिल्ह्यांचा दौर राज ठाकरे करणार आहेत.
सध्या अमित पक्षातील कामकाज समजून घेण्यासाठी विविध शाखांना भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर उद्धव- राज ठाकरे आणि आता ठाकरे कुटुंबातील तिसर्या पिढीतले आदित्य ठाकरेही राजकारणात एण्ट्री घेतली. आता याच पिढीतील अमितही राजकारणात आपलं नावअधोरेखित करायला सज्ज झाले आहेत.
२२ जुलैला औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला राज संबोधित करणार आहेत. या चार जिल्ह्यांनंतर मराठवाड्यातील उरलेल्या जिल्ह्यांचा दौरा ८ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. यात २७ जुलैला गणेश कला क्रीडा मंदिरात कार्यकर्त्यांचा पुन्हा एक मेळावा राज घेणार आहेत. तर ५ ऑगस्टला नवी मुंबई वाशीत राज मनसे मनपा कर्मचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात भाषण करणार आहेत.
Add new comment