दोन्ही क्षीरसागर काका - पुतण्याविरुद्ध एमआयएमची लढाई - शेख शफीकभाऊ
क्षीरसागर रडीचा डाव खेळू लागले ; हिम्मत असेल तर समोर या मग कळेल कोण कोणाला मॅनेज आहे
बीड - जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर हे काका - पुतणे एकच आहेत. आपल्या राजकीय आणि घराणेशाहीच्या राजवटीला धक्का लागू नये म्हणूनच त्यांनी ही नौटंकी केली. क्षीरसागर म्हणजे एक नाटक कंपनी असून आता जनता त्यांच्या नौटंकीला भीक घालणार नाही. ' चाचा ही भतीजा है और भतीजा ही चाचा है ' हे क्षीरसागरांचे बौद्धिक दिवाळखोरीचे पर्व संपवण्यासाठीच एमआयएम मैदानात उतरली असून आमची लढाईच दोन्ही क्षीरसागरांच्या विरोधात असल्याचे बीड विधानसभा मतदार संघाचे एमआयएमचे अधिकृत उमेदवार शेख शफीकभाऊ यांनी म्हटले आहे.
बीड शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जागोजाग कचऱ्याचे ढीग साचले आहेत तरीही नगर परिषदेला थ्री स्टार मानांकन देण्याचा घाट दोन्ही क्षीरसागरांनी घातला आहे. संदीप क्षिरसागर यांचा खरंच काकाला विरोध आहे तर त्यांनी पालिकेत थ्री स्टार मानांकनला विरोध का केला नाही ? यावरून बाहेर त्यांच्या विरोधात ढोल वाजवायचा आणि आता एकमेकांना गळे लावायचे ? हा प्रकार आता जनता खपवून घेणार नाही.मल्टीपर्पज ग्राउंडला छत्रपती संभाजीराजे यांचे नाव देण्यास याच क्षीरसागरांनी सुरुवातीला विरोध केला. त्यांच्या नावाचे बोर्ड काढून काढले आणि मराठा समाजाला छळ करून नंतर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देवून श्रेय घेतले. त्यांचे कोणतेही काम श्रेयासाठीच असते. क्षीरसागर यांनी प्रत्येक वेळी मुस्लिम आणि मराठा समाजाचा बळी घेतलेला आहे. नवीन राजकीय नेतृत्व त्यांनी कधीच उभे राहू दिले नाही.अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहासाठी आलेला निधी परत गेला मात्र क्षीरसागर यांनी ते होऊ दिले नाही. मतांवर डोळा ठेवायचा आणि प्रत्येक निवडणूकीत मुस्लिम समाजाच्या दारात जावून मतांची भीक मागायची हाच उद्योग त्यांनी केला आहे. जातीत जातीत आणि भावा - भावांमध्ये वाद निर्माण करून त्यांच्यातच त्यांनी फोडाफोडी केलेली आहे. बीडमध्ये गुंडगिरी कोणी वाढवली हे जनतेला चांगलेच माहीत आहे. दोन्ही जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर हे काका - पुतणे एकच आहेत. बीडमध्ये दुसरा पर्याय उभा राहू नये. आपल्या राजकीय आणि घराणेशाहीच्या राजवटीला धक्का लागू नये म्हणूनच ही नौटंकी त्यांनी केली. क्षीरसागर म्हणजे एक नाटक कंपनी असून आता जनता त्यांच्या नौटंकीला भीक घालणार नाही. ' चाचा ही भतीजा है और भतीजा ही चाचा है ' हे क्षीरसागरांचे बौद्धिक दिवाळखोरीचे पर्व संपवण्यासाठीच एमआयएम मैदानात उतरली असून आमची लढाईच दोन्ही क्षीरसागरांच्या विरोधात आहे.
क्षीरसागर आपल्या सोबत असणाऱ्यांना गुलाम समजतात आणि तोच विरोधात गेला तर त्याला मॅनेज आहे असे म्हणतात. हिंमत असेल तर समोर या कोण कोणासोबत मॅनेज आहे हे मी ते स्पष्ट होईल. आतापर्यंत बीड जिल्ह्यात मॅनेज राजकारण कोणी केले हे देखील जनतेला माहीत आहे. माझे जुने फोटो व्हायरल करून जयदत्त क्षीरसागर रडीचा डाव खेळत आहे. फोटो काढून ते व्हायरल करायचेच झाले तर या क्षीरसागरांचे जुने फोटो काढले आणि ते व्हायरल केले तर सोशल मीडिया सुद्धा हँग होईल. त्यामुळे क्षीरसागरांनी फोटोचा नाद करून लोकांची दिशाभूल करू नये. थेट समोर यावे मग बघू ? काय खरे काय खोटे. डॉ. भारतभूषण यांनी शहराची वाट लावली. शहरातील मोक्याच्या जागी आरक्षण टाकून ठेवले आहे. नको तिथे आरक्षण टाकून भूखंड
बळकावून त्या माध्यमातून लाडके गुत्तेदार पोसले जात आहेत. आणि जयदत्त क्षीरसागर यांनी बीड मतदारसंघात केवळ गाजावाजा आणि दिखावा करून बोंबाबोंब करून टाकली. विकासाचा डंका पिटला जातोय मात्र मतदारसंघ भकास करण्याचे काम त्यांनी केले. संदीप क्षीरसागर यांनी आघाडीच्या नावाखाली या दोन्ही काकांना मदत केली. आता क्षीरसागरांची ही राजकीय दुकानदारी बंद करून बीड मतदारसंघ क्षीरसागर मुक्त करण्यासाठी माझी उमेदवारी आहे .
बीड मतदारसंघात एकही विकासाचे काम नाही. तरुणांना रोजगार नाही, मोठी बाजारपेठ नाही, उद्योग नाहीत.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्याचे प्रश्न आहेत. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून काहीच ठोस उपाययोजना नाहीत. महिला सक्षमीकरणाकडे दुर्लक्ष अशा कितीतरी समस्या असतांना स्वयंघोषित विकासपुरुष विकासाचा खोटा आव आणत आहेत. मात्र आता एमआयएमच्या माध्यमातून पक्षाध्यक्ष खा. असोदोद्दीन ओवेसी साहेब, अकबरोद्दीन ओवेसी , प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्ह्यातील एमआयएमचे सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते यांच्या सहकार्याने व जनशक्तीच्या बळावर मी बीड मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्यास कटिबद्ध आहे. मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा , आरोग्य, बेरोजगारी, उद्योग असे विविध प्रश्न प्राधान्याने सोडवण्याच्या प्रयत्न करेल. बीड मतदारसंघाचे नाव राज्यात नावलौकिक मिळवेल असा विकास करून दाखवू. जनतेने नेहमीच मला साथ देवून माझ्या राजकीय आणि सामाजिक कार्याला बळ दिले आहे. त्यामुळे आताही मला साथ द्या , सोबत या , नक्कीच परिवर्तन घडवू हीच मतदारांना विनंती आहे.
डॉ. भारतभूषण यांनी आधी राजीनामा द्यावा आणि मगच शिवसेनेचा प्रचार करावा
बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. सेक्युलर पक्षाचे उमेदवार म्हणून मतदारांनी त्यांना निवडून दिले. आता मात्र त्यांनी स्वार्थ साधून शिवसेनचा गमजा गळ्यात घातला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते त्यांच्याच व्यासपीठावर आहेत. डॉ. भारतभूषण यांचा आपल्या विकास कामांवर एव्हढाच विश्वास असेल तर त्यांनी आधी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा देवून जनतेसमोर यावे मग कळेल कोण किती पाण्यात आहे.
Add new comment