लाइव न्यूज़
शिक्षण संस्था संघाचे जिल्हाकचेरीसमोर धरणे
बीड, (प्रतिनिधी):- शासनाने पवित्र पोर्टलनुसार भरती करण्याचे जाहीर केले आहे. सदरील अधिकार शिक्षण संस्थांचा असुन तो निर्णय शासनाने मागे घ्यावा, २० टक्के पात्र अनुदानित शाळांना टप्प्यानुसार १०० टक्के अनुदान द्यावे यासह विविध मागण्यांसाठी बीड जिल्हा शिक्षणसंस्था संघाच्यावतीने आज जिल्हाकचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक संस्था संघाच्यावतीने आज धरणे आंदोलन करण्यात आले. २००५ नंतर लागलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना जुनी पेंन्शन योजना लागू करावी, अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदानासह घोषित करावे, मुख्याध्यापक- शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, शिक्षकेत्तर कर्मचार्यांची तात्काळ भरती सुरु करावी, अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावावा, पाचवी ते दहावी असणार्या शाळांना ११ व १२ वीचे वर्ग जोडण्यास परवानगी द्यावी, प्राथमिक शाळेमध्ये लिपीक, सेवक मान्य करावे, वेतनेत्तर अनुदान ३० टक्क्याप्रमाणे देण्यात यावी आणि खाजगी शाळेस भाडे मुल्यांकनानुसार देण्यात यावे आदि मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. निवेदनावर जिल्हाध्यक्ष दिपक घुमरे, उपाध्यक्ष प्रा.सर्जेराव काळे, उत्तमराव पवार, हनुमंतराव थोरवे, जितेंद्र डोंगरे, महादेव काळे, गोविंद वाघ, निवृत्ती भांगे, प्रताप रांजवण आदिंच्या स्वाक्षर्या आहेत.
Add new comment