लाइव न्यूज़
केंडे पिंप्री प्रकरणात पोलिसांची उच्चस्तरीय चौकशी करा-भारिप बहुजन महासंघ
Beed Citizen | Updated: July 14, 2018 - 3:21pm
बीड, (प्रतिनिधी):- वडवणी तालुक्यातील केंडे पिंप्री येथील शिंदे कुटूंबियांवर जमिनीच्या वादातून हल्ला झाला. या प्रकरणात मारहाण करणार्यांनीच शिंदे कुटूंबियांवर कलम ३०७ प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत. सदरील प्रकरणात वडवणीचे पोलिस अधिकारी शिंदे कुटूंबियांविरुद्ध असल्याचा आरोप करत भारिप बहुजन महासंघाने उपविभागीय पोलिस अधिकार्यासह वडवणीच्या पोलिस निरिक्षकांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, केंडेपिंप्री येथील शिंदे कुटूंबियांना बेदम मारहाण झालेली आहे. या प्रकरणात त्यांच्यावरच गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असुन पोलिस शिंदे कुटूंबियांविरुद्ध असल्याचा आरोप पत्रकात करण्यात आला आहे. सदरील घटना जातीय तेढ निर्माण करणारी असुन या प्रकरणाशी संबंधित पोलिस अधिकार्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी अन्यथा लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा ईशारा भारिप बहुजन महासंघाचे युवा नेते अजय सरवदे, आनंद कुशेर, राजाभाऊ शिंदे, संजय बनसोडे, शिवाजी थोरात, अजय साबळे, आकाश साबळे, रंजित साबळे, माणिक वडमारे आदिंनी पत्रकाद्वारे दिला आहे.
Add new comment