लाइव न्यूज़
Add new comment
बीडमध्ये विकास मंचची निदर्शने

बीड,(प्रतिनिधी) पीककर्जासाठी शेतकर्यांच्या पत्नीकडे शरीरसुखाचि मागणी करणार्या बुलढाणा जिल्ह्यातील सेंटृल बँक दाताळ शाखेचां मॅनेजरला कठोर शासन करावे या मागणीसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचच्या कार्यकर्त्यांनी सेंटृल बँक बीड शाखेसमोर आज जोरदार निदर्शने केली
या वेळी राहूल कदम, आकाश सोनवणे, रमेश थोरात, प्रशांत ओव्हाळ, कपिल शिंदे, गौतम वीर,महादेव बर्डे, महावीर मोरे सह अनेक शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.शाखा व्यवस्थापकांना निवेदन देऊन शेतकर्यांना तात्काळ पीककर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी व मागासवर्गीय महामंडळाचि प्रकरणे निकाली काढण्याची मागणी डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे अध्यक्ष डा.ॅ जितेंद्र ओव्हाळ यांनी केली
