लाइव न्यूज़
बीडच्या समता सैनिकावर मराठवाड्याची जबाबदारी

आ. छगन भुजबळांनी ऍड. सुभाष राऊत यांना दिले बळ
बीड, (प्रतिनिधी): अखिल भारतीय समता परिषदेच्या माध्यमातून आ.छगन भुजबळ यांच्या पाठिशी ताकद उभी करणार्या ऍड. सुभाष राऊत यांच्यावर मराठवाड्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबईत झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बीडच्या जिल्हाध्यक्षपदासह मराठवाड्याच्या अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे.
बीड येथील अखिल भारतीय समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष ऍड. सुभाष राऊत यांनी आ. छगन भुजबळ यांच्या पाठिशी मोठी ताकद उभी केली आहे. संघटन बांधणीच्या माध्यमातून त्यांनी स्वत:चे कर्तृत्व सिध्द केले आहे. अडीचणीच्या काळातही छगन भुजबळ यांच्या पाठिशी ते खंबीरपणे उभे राहिले. जिल्हाभरातील समता सैनिकांनीही त्यांच्या पाठिशी उभे केले. ऍड. सुभाष राऊत यांचे संघटन बांधणीतील कौशल्य आणि समाजकारण पाहता त्यांच्यावर मराठवाड्याची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. मुंबई येथील बांद्रा येथे काल समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत आ.छगन भुजबळ यांनी ऍड. सुभाष राऊत यांची मराठवाडा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. यापुढे ऍड. राऊत बीड जिल्हाध्यक्षपदासह मराठवाड्याचे अध्यक्ष म्हणून कारभार पाहणार आहेत. राऊत यांच्या निवडीने सर्वत्र स्वागत होत आहे.
Add new comment