बीडमध्ये खा.प्रितमताईंच्या हस्ते पुणेरी पगडीने गुणवंतांचा सत्कार

बीड, (प्रतिनिधी): आपल्यातील सुप्तगुण ओळखुन करीअर निश्चीत करता येते. हे खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी बीडमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना अनोखी संवादशैली वापरून दाखवुन दिले. आर्य चाणक्य सामाजीक प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित सोहळ्यात खा.प्रितमताईंच्या हस्ते पुणेरी पगड्यांनी गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. 
बीड शहरातील यशवंतराच चव्हाण नाट्यगृहात रविवारी दुपारी तीन वाजता आयोजीत गुणगौरव सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी नेहमी प्रमाणे भाषण न करता उपस्थीत गुणवंत व पालकांशी दिलखुलास संवाद साधत सर्वांना बोलते केले. यावेळी व्यासपीठावर औरंगाबाद महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती राजु वैद्य, आमदार संगीता ठोंबरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, स्काऊटचे राज्य आयुक्त संतोष मानूरकर ,जिल्हापरिषदेचे सभापती संतोष हंगे, व्यंगचित्रकार सुहास पालिमकर, सेवाश्रमाचे संचालक सुरेश राजहंस, मंजरथच्या सरपंच तथा एरॉनॉटीकल इंजीनअर ऋतुजा आंनदगावकर , जिल्हा श्रमीक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष महेश वाघमारे, आदी उपस्थीत होते. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.