लाइव न्यूज़
आक्रोश मोर्चाला बीडमध्ये भीमसागर उसळला
संभाजी भिडेला पाठीशी घालणार्या राज्य सरकारला आंबेडकरी अनुयायी धडा शिकविणार - पप्पु कागदे
बीड,(प्रतिनिधी)ः-
फुले,शाहू, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभऊ साठेंच्या पुरोगामी महाराष्ट्रात माणूसकिला काळीमा फासणार्या घटनांची मालिका सुरू झाली आहे. राज्यासह देशभरात बौध्द, मुस्लिम, मातंग, चर्मकार समाज बांधवांवर अमानुष हल्ले, नग्न करून गावभर धिंड, सामुहिक बहिष्कार हे प्रकार वाढले आहेत. समाजामध्ये भयभित वातावरण निर्माण करणारा भिमा कोरेगाव दंगलीचा मुख्य सुत्रधार संभाजी भिडे यास अटक केली जावी. यासह संविधानिक हक्कासाठी युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे यांनी जिल्हा कचेरीवर शुक्रवारी आक्रोश मोर्चा काढून बहूजन विरोधी सरकारचा निषेध नोंदवला.
संविधानिक हक्क आणि अन्याय-अत्यचाराला वाचा फोडण्यासाठी रिपाइंकडून आक्रोश मोर्चा काढ्यात आला. या आक्रोश मोर्चामध्ये जिल्ह्यातील बौध्द, मुस्लिम, मातंग, चर्मकार समाज बांधवांसह बहूजन समाज हजारोंच्या संख्येने सामिल झाला होता.
या मोर्चामध्ये पप्पु कागदे यांनी सरकारवर कडाडून टिका करीत म्हणाले की, शुरविरांना मानवंदना देण्यासाठी भिमा-कोरेगाव शौर्य स्तंभावर गेलेल्या समाज बांधवांसह स्त्रीया व लहान मुलांवर दगडफेक करून दंगल घडवून आणणार्या संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन सुध्दा त्याला आजपर्यंत अटक करण्यात आली नाही. या देशात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले स्वातंत्र्य केवळ शोभेची वस्तू झाली आहे. भिमा कोरेगावच्या शूरवीराना अभिवादन करण्यासाठी ज्यांनी एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. त्यांना देशद्रोह्यां प्रमाणे अटक केली जाते. परंतु भिमा कोरेगाव दंगलीचा सूत्रधार ज्याचे नाव एफआयआर मध्ये असतांनाही, पुरावे नसल्याचे कारण पुढे करून संभाजी भिडेला अटक केली जात नाही. यावरून सरकारचे दुटप्पी धोरण दिसून येत आहे. आज आम्ही इतिहासातील सर्वात वाईट दिवसातून जात आहोत. एकीकडे ऍस्ट्रॉसिटी कायद्यात बदल करून दलितांवर खुलेआम अत्याचार करण्याचा जणू परवानाच दिला जात आहे.
मागासवर्गीय समाज बांधवांना भारतीय संविधानाने मिळवून दिलेल्या हक्क व अधिकारापासून वंचित ठेवण्याचे काम राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. या सर्व घटनांचा निषेध नोंदविण्यासाठी रिपाइंच्या वतीने काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चाच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर झालेल्या जाहिर सभेत असे प्रतिपादन आक्रोश मोर्चाचे आयोजक तथा युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे यांनी केले आहे. या आक्रोश मोर्चात हजारो समाजबांधव सहभागी झाले होते
.
शासन दरबारी मांडल्या मागण्या
-ऍस्ट्रॉसिटी कायद्यात कसलाच फेरबदल करण्यात येवू नये.
-कसत असलेल्या गायरान जमिनी नावे करण्याच्या विरोधात काढण्यात आलेला शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा.
-एल्गार परिषदेच्या आयोजकांवरील नक्षलवादी गुन्हे मागे घ्या.
-रमाई घरकुल योजनेसाठी ग्रामपंचायत ठरावी अट रद्द करा
-महात्मा फुले मंडळासह सर्व महामंडळांना भरीव निधी द्या.
- दलित मुस्लिम यांच्यावर अन्याय-अत्याचार करणार्या समाजकंठकार कारवाई करण्यात यावी
- भटक्या विमुक्तांसाठी रेणके आयोगाची शिफारस लागू करण्यात यावी.
-परीट समाज बांधवांना भांडे समिती आयोग लागू करण्यात यावा.
Add new comment