मतदाना बाबत सोमवारी तर अपात्रतेबाबत सुनावणी मंगळवारी
बीड प्रतिनिधी:-
कचरा फेक प्रकरणातील आघाडीच्या अपात्र नगर सेवकांची मते ग्राह्य धरावी की नाही याबाबतचा निकाल सोमवारी तर त्यांच्या अपात्रतेचा बाबत सुनावणीआता मंगळवारी होणार आहे,आज याबाबत औरंगाबाद खंडपीठात झालेल्या चर्चे नन्तर न्यायालयाने निर्णय दिला आहे
कचरा फेक प्रकरणी गणेश वाघमारे व इम्तियाज तांबोळी यांनी आघाडीच्या 10 नगरसेवकांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली आहे,न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यमंत्री देशमुख यांनी 10 नगरसेवकांना अपात्र घोषित केले आहे या विरुद्ध त्यांनी पुन्हा न्यायालयात आव्हान दिले आहे,याबाबत या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी होणार असून विधान परिषद निवडणुकीत त्या 10 नगरसेवकांनी केलेले मतदान ग्राह्य धरावे की नाही याबाबतचा निकाल आता सोमवारी लागण्याची शक्यता आहे,आज शुक्रवारी या दोन्ही वेगवेगळ्या याचिकेवर न्यायालयाने म्हणणे ऐकून घेतले आहे,या प्रकरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूक निकाल खोलंबून राहिला आहे,सोमवारी याबाबत अंतिम निकाल जाहीर होऊन मतमोजणी होईल,वाघमारे व तांबोळी यांच्यावतीने ऍड गवारे पाटील व ऍड सय्यद शाहेद यांनी बाजू मांडली आहे
Add new comment