लाइव न्यूज़
मांजरसुंबा ते केज रस्त्याचे निकृष्ट काम करणार्या एचपीएम कंपनीचे काम रद्द करा जि.प.सदस्य भरत काळे यांची जिल्हाधिकार्यांकडे तक्रार

बीड, (प्रतिनिधी): मांजरसुंबा ते केज रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करत जिल्हा परिषद सदस्य भरत काळे यांनी आज जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. एचपीएम कंपनीचे काम रद्द करून ते दुसर्यांना द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर गवारी, रत्नागिरी, नेकनूर ते कळंसबर या गावात जाणार्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करा अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
जि.प. सदस्य भरत काळे यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदनात म्हटले आहे की, मांजरसुंबा ते केज रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट होत आहे. रस्ता जागोजाग उकरून टाकलेला आहे. कामामध्ये मुरुमऐवजी माती भरली असून एचपीएम कंपनीच्या नियोजन शुन्य कारभारामुळे दररोज अपघात होत असल्याचे म्हटले आहे. या प्रश्नी आपण काम बंदही केले होते. मात्र संबंधीत कंपनीने व प्रशासनाने रस्ते दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिले होते. ते अद्यापही दुरुस्त करण्यात आलेले नाही. या संदर्भात विचारणा केल्यास अरेरावीची भाषा वापरली जाते. त्यामुळे मांजरसुंबा-केज रस्त्याचे एचपीएम कंपनीला दिलेले काम तात्काळ रद्द करून अन्य कंपनीला द्यावे, अशी मागणी भरत काळे यांनी केली आहे.
Add new comment