Add new comment

सीओ जावळीकरांनी कर्मचार्‍यांच्या वेतनाचा प्रश्‍न निकाली काढला

बीड, (प्रतिनिधी): नगर पालिकेतील कर्मचार्‍यांचे वेतन सात ते आठ  महिन्यांपासून प्रलंबीत होते. या प्रश्‍नी सीओ धनंजय जावळीकर यांनी नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार लेखा विभागात सुचना देवून हा प्रश्‍न निकाली काढला, त्यामुळे कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बीड नगर पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून रूजू झाल्यानंतर डॉ.धनंजय जावळीकर  यांनी कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नांना प्राधान्य दिले. नागरिकांना सुविधा पुरवण्याबरोबरच कर्मचार्‍यांच्या समस्यांकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याची बाब लक्षात घेवून मुख्याधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांच्या वेतनाचा प्रश्‍न निकाली काढला. सात ते आठ महिन्यापासून कर्मचार्‍यांचे वेतन प्रलंबीत होते. त्यामुळे नगराध्यक्ष डॉ. भारतभुषणी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली जावळीकर यांनी लेखा विभागाला सुचना देत कर्मचार्‍यांचे थकीत वेतन तात्काळ काढण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर यापुढ नियमित वेतन करण्याच्या सुचनाही दिल्या. जावळीकर यांच्यामुळे कर्मचार्‍यांना दिलासा मिळाल असून त्याबद्दल त्यांचा कर्मचारी संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुन्ना गायकवाड, रूपकांत जोगदंड, भागवत जाधव, अमोल शिंदे, पवन लोहट, लखन प्रधान आदींची उपस्थिती होती.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.