लाइव न्यूज़
समाजातील वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी वृंदावन वस्तीगृहात मोफत शिक्षण व राहण्यासाठी व्यवस्था-ऍड.युवराज बहिरवाळ
Beed Citizen | Updated: June 12, 2018 - 2:37pm
बीड, (प्रतिनिधी):- मौजे पिंपळवाडी ता.जि.बीड येथे गुरुकुल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंतर्गत वृंदावन वस्तीगृह, पिंपळवाडी हे निसर्गरम्य वातावरणात गेल्या वर्षीपासुन सुरु झाले असुन समाजातील अनाथ आत्महत्याग्रस्त शेतकर्यांचे मुले तसेच समाजातील वंचित घटकातील विद्यार्थींना मोफत राहणे, खाणे व शिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सन २०१६-१७ व २०१८-१९ या वर्षांसाठी आतापर्यंत ८८ मुलाचे प्रवेश झालेले आहेत. तरी आणखक्ष प्रवेश सुरु असुन विद्यार्थ्याने प्रवेश घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहेत.
वृंदावन हा प्रकल्प हा निस्वार्थ भावाने तसेच समाजातील दानशुर व्यक्तीच्या माध्यमातून चालू आहे. अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, तसेच सुसज्ज असे खेळाचे मैदान, शैक्षणिक साहित्य यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर संस्कार घडवले जात आहेत.
Add new comment