Add new comment

बीडमध्ये चौदा बिअरबार चालकांना दंड

बीड, (प्रतिनिधी):- शहरातील बिअरबार रात्री ११ वाजेपर्यंत बंद करणे आवश्यक असतांना त्यानंतरही १४ बिअरबार उघडे असल्याचे दिसुन आल्याने पोलिसांनी संबंधित बार चालकांना दंड ठोठावला.
बीड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोनि.पुरभे, कर्मचारी सय्यद शहेंशाह, नितीन काकडे, हितेश, संदिप सानप हे रात्री उशिरा पेट्रोलिंग करत असतांना त्यांना अनेक बिअरबार रात्री ११ नंतरही सुरु असल्याचे दिसुन आले. नियमाप्रमाणे ११ वाजण्यापुर्वी बिअरबार बंद होणे आवश्यक असतांनाही ते सुरु असल्याचे दिसुन आल्यानंतर १४ बिअरबार चालकांना पोलिसांनी दंड ठोठावला आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.