लाइव न्यूज़
जिल्ह्याला २२४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी धोरणात्मक निर्णय


ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत राज्यातील वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी व ग्रामीण भागातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येत आहेत. सन २०१९-२० या वर्षातील रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी ठरवलेल्या उद्दिष्टांनुसार रस्त्यांच्या लांबीचे जिल्हानिहाय वाटप करण्यात आले आहे. राज्यात अस्तित्वात असलेल्या कोअर नेटवर्कमधील इतर जिल्हामार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांची एकुण गृहीत लांबी आणि त्याच जिल्ह्यातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांची लांबी यास ५० टक्के गुण त्याचबरोबर त्या जिल्ह्याच्या मानवविकास निर्देशांकास ५० टक्के गुण या आधारावर जिल्हानिहाय लांबी विचारात घेण्यात आली आहे. त्यानुसार बीड जिल्ह्याला २२४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे उद्दिष्ट मिळाले आहे.
Add new comment