लाइव न्यूज़
केजमध्ये एमआयएमच्या तालुकाध्यक्षावर पिस्तुल रोखून सशस्त्र हल्ला
हल्लेखोर फरार; जखमी किल्लेदार यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु
बीड, (प्रतिनिधी):- अज्ञात सात ते आठ हल्लेखोरांपैकी एकाने एमआयएमच्या तालुकाध्यक्षावर पिस्तुल रोखून इतरांनी सशस्त्र हल्ला केल्याची घटना रात्री ११ वाजण्याच्या सुमारास केजमधील कळंब चौकात घडली. जखमी अखिल किल्लेदार यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्र.५ मध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान दोन महिन्यापुर्वी किल्लेधार यांनी सावकारकीच्या प्रकरणाशी संबंधीत व्हिडीओ क्लिप व्हायरल केली होती. त्याच रागातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यामागे काही बड्या आसामींचाही हात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
केज येथील एमआयएमचे तालुकाध्यक्ष अखिल शफाउद्दीन इनामदार हे रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कळंब चौकातून जात असतांना अज्ञात सात ते आठ जणांनी त्यांना अडविले. त्यातील एकाने किल्लेदार यांच्या कानावर पिस्तुल रोखत इतरांनी शस्त्राने त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत किल्लेदार गंभीररित्या जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुपारी उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नव्हता. दोन महिन्यापुर्वी किल्लेदार यांनी केज आणि परिसरात सुरु असलेल्या सावकारकीच्या प्रकरणाशी संबंधीत एक व्हिडीओ क्लिप सोशल मिडीयावरुन व्हायरल केली होती. त्याच रागातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Add new comment