छत्रपती शाहू महाराजांनी समाजात विचारांची क्रांती घडवली पुतळा अनावरण प्रसंगी आ.जयदत्त क्षीरसागर यांचे भावोद्गार

बीड, (प्रतिनिधी): छत्रपती शाहू महाराज दुरदृष्टी असणारे राजे होते. माणूस शिकला पाहिजे म्हणून त्यांनी त्यास प्राधान्य दिले. सामाजिक न्यायासाठी आयुष्य वेचणार्‍या छत्रपती शाहू महाराजांनी समाजात विचारांची क्रांती घडवल्याचे भावोद्गार आ. जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
बीड येथील मल्टीपर्पज क्रिडांगण परिसरात आज सकाळी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रदिप सोळंके, कॉ.नामदेव चव्हाण, नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर, ऍड. जगन्नाथराव औटे, युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर, सभापती मुखीदलाला, सादेकभाई, सभापती जयश्रीताई विधाते, मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर, गणेश वाघमारे, ऍड. विकास जोगदंड, विष्णू वाघमारे, प्रा.सुशिलाताई मोराळे, बबन वडमारे, भास्कर जाधव, रविंद्र कदम, राहुल वायकर, सौ.काळे आदींची उपस्थिती होती.
आ.क्षीरसागर म्हणाले, बीड शहर पुतळ्यांचे शहर आहे. देशात अनेक रत्न व माणके होवून गेली. त्यांच्या समृध्द कामगिरीची शिकवण समाजाला मिळावी. पुतळे प्रतिकात्मक असले तरी त्यांचे विचार जिवंत असल्यास ते लोकांना प्रेरणा देतात. छत्रपती शाहू महाराज हे क्रांतीकारी व्यक्तीमत्त्व होते. लोकशाही नसतानाही लोकहिताचे कायदे करणारे छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक न्यायासाठी आपले आयुष्य वेचले. आरक्षणाचे खरे जनक तेच होते. लोकशाहीत लोकांना काय हवे आहे? ते ओळखता आले पाहिजे,ती दृष्टी छत्रपती शाहू महाराजांकडे होती.नवीन पिढीसाठी त्यांचे विचार सतत प्रेरणादायी राहतील, असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर यांनी केले तर आभार महेश धांडे यांनी मानले.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.