विद्यार्थीनीचा पाण्यात बुडून मृत्यू

बीड, (प्रतिनिधी):- मांजरा धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात बुडून विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी धानोरा खुर्द येथे घडली. विद्युत पंपाच्या पाईपला तिचा मृतदेह आढळून आला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द येथील सुप्रिया वैजिनाथ गायसमुद्रे (११) ही बुधवारी आजोबासोबत शेतामध्ये गेली होती. सरपण घेऊन आल्यानंतर हात धुवण्यासाठी मांजरा नदीच्या डाव्या कालव्याजवळ गेली असता पाय घसरुन ती पाण्यात पडली. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यानंतर आज सकाळी कोपरा शिवारात विद्युत पंपाच्या पाईपला तिचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत आढळून आला.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.