लाइव न्यूज़
कामे होवू लागली आमच्यामुळे श्रेयासाठी आघाडीची धडपड-सभापती शेख महंमद
बीड, (प्रतिनिधी):- नगर पालिकेत सुरुवातीला आम्ही स्वतंत्र गट स्थापन करुन शहर विकासासाठी सत्तेत आघाडीबरोबर राहिलोत मात्र कुठल्याही कामात स्वत:ची टिमकी वाजवून घेवून श्रेय लाणण्याचा उद्योग आघाडीकडून होवू लागला. शहर विकास तर दूरच पण स्वार्थी राजकारणासाठी सत्तेचा उपयोग होसवू लागला. त्यामुळे शहराचा विकास थांबला, वर्षभरानंतर आम्ही केवळ शहरातील समस्या आणि महत्वाची कामे मार्गी लागावेत यासाठी नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही नव्याने सत्तेत सामील झाल्यानंतर शासनाच्या योजना आणि नगरपालिकेचे खोळंबलेली कामे तात्काळ सुरु केली. नगर पालिकेची सत्ता हातात असतांना ज्यांनी कधी उद्घाटने आणि विकास कामे केली नाहीत तेच आज अधिकार नसताना आम्ही सुरु केलेल्या कामावर जावून स्वत:ची टिमकी वाजवून घेत श्रेयासाठी धडपड करत असल्याची घणाघाती टिका नगरपालिकेचे बांधकाम सभापती शेख महमंद खालेद यांनी केली आहे.
बीड नगर पालिकेत एमआयएमच्या स्वतंत्र गटाने सत्ता स्थापनेच्या वेळी आघाडीची साथ दिली. बीड शहराच्या विकासासाठी आघाडीकडून ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा होती. वर्षभर सत्तेत असतांनाही शहराचे प्रश्न मार्गी लागण्याऐवजी वाढत गेले. प्रस्तावित विकास कामे थांबली शासनाच्या योजना कशा राबवाव्यात याबाबतही निश्चित धोरण राहलिे नाही. अनेक कामे होत असतांना केवळ श्रेयवादामुळे होवू शकली नाहीत आम्ही स्वतंत्र गट स्थापन करुन केवळ शहरवासियांच्या हितासाठी विकासाबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला होता. आघाडीकडून केवळ राजकारण होत असल्याचे दिसल्यामुळेच आम्ही नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला. आम्ही सत्तेत केवळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सहभागी झालोत कार्यभार हाती घेताच आम्ही रखडलेली कामे तात्काळ सुरु करण्याचा निर्णय घेतला. प्रारंभी ज्या भागात कामे खोळंबली तिथे जावून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. एकदा नव्हे तर दहा वेळा तेथील प्रतिष्ठीत नागरिकांना भेटलो, जिथे समस्या तिथे सामंजस्य दाखवत कामे सुरु केली. यासाठी नगराध्यक्ष यांनी देखील आम्हाला समर्थ साथ दिली. पदाचा उपयोग प्रसिद्धीसाठी नसुन केवळ शशहर विकासासाठी करायचा आम्ही निश्चय केला आहे. शहरातील सिमेंट रस्ते, नाल्या बांधकाम, जुना बाजार, मोमीनपुरा रस्ता अमृत अटल योजनेची कामे, उद्यानाची कामे, विजेचे प्रश्न वाढीव वस्तीमधील रस्ते, वीज पाणी प्रश्न अशा अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नगराध्यक्ष यांच्या बरोबर राहून कामाचा आराखडडा तयार केला आणि ही कामे तात्काळ सुरु केली. आज जुना बाजार व मोमीनपुरा येथील केवळ आम्ही सत्तेत येवून सुरु केला आहे. मात्र श्रेयासाठी आघाडीची मंडळी धडपड करतांना पाहून त्यांची किव येत आहे. आपल्याला कोणता अधिकार आहे. ज्याचे आपण उदघाटन करत आहोत किमान याचा तरी विचार करावा अशा उद्योगामुळे जनतेत हसु होवू लागले आहे. अशी घणाघाती टिका करुन शहरवासियांनी अशा फसव्या उदघाटनावर विश्वास ठेवू नये असे आवाहनही सभापती शेख महमंद खालेद, शेख मतीनभाई, शेख समीभाऊ, शेख सरफराज (बाबा), मोमीन अझकद्दीन, सोनूशेठ यांनी केले आहे.
Add new comment