पिंपळनेरवासियांचा महामार्गावर दोन तास ठिय्या

तालुका निर्मितीची मागणी; माजीमंत्री बदामराव पंडितांसह अनेकांची मागणी
बीड, (प्रतिनिधी):- तालुका निर्मितीच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या पिंपळनेरवासियांनी आज दुपारी बीड-परळी महामार्गावर दोन तास ठिय्या मांडून रास्तारोको आंदोलन केले. माजीमंत्री बदामराव पंडित यांच्यासह पिंपळनेर आणि परिसरातील सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील ग्रामस्थांनी तालुका निर्मितीची मागणी लावून धरली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण केल्यानंतर आज दुपारी बीड-परळी महामार्गावरील घाटसावळीजवळ संतप्त ग्रामस्थांनी ठिय्या मांडून रास्तारोको आंदोलन केले. यावेळी तालुकानिर्मिती संदर्भात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रस्तारोको केल्याप्रकरणी असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. रास्तारोको आंदोलनामुळे वाहतुक ठप्प झाली होती. यावेळी तालुकानिर्मितीच्या मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.