लाइव न्यूज़
बीड जिल्ह्यात भोंदू बाबाकडून मुलीवर अत्याचार पिडीतेवर जिल्हा रुग्णालयात उपचार; सर्वत्र खळबळ
बीड, (प्रतिनिधी):- आजार बरा करतो असे म्हणत एका भोंदूबाबाने १५ वर्षीय मतिमंद मुलीला स्वत:कडे ठेवून घेत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार आज दुपारी उघडकीस आला आहे. पिडीत मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असुन दुपारनंतर पोलिस तिचा जबाब नोंदवणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान महिला आणि मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज दुपारीच मुक मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चेकरी घरी परतत नाहीत तोच पुन्हा एकदा अत्याचाराची घटना उघडकीस आल्याने संताप व्यक्त होत आहे.
बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पिडीत मुलीच्या सांगितले की, केज तालुक्यातील ऊसतोड मजुर पाल्याने आजारी असलेल्या १५ वर्षीय मुलीला तेथीलच एका बाबाकडे दाखवत त्यांच्याकडून उपचार सुरु केले होते. काही वर्षानंतर सदरील भोंदूबाबाने मुलीला माझ्याकडे ठेवा मी तिचा आजार बरा करतो असे म्हणून तिला स्वत:कडे ठेवून घेतले होते. त्यानंतर सदरील भोंदूबाबाने मुलीच्या आजारपणाचा गैरफायदा घेत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. बीड-मांजरसुंबा या भागात नेऊन अत्याचार केल्यानंतर दोन वेळा गर्भपात करुन घेतल्याचे मुलीने म्हटले आहे. पिडीत मुलीला आज दुपारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन तिच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिस अधिकार्यांनीही सदरील घटनेची दखल घेतली असुन दुपारी उशिरा तिचा जबाब नोंदविण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
Add new comment