Add new comment

गर्भपातासाठी छळ; जाळून घेतलेल्या विवाहितेचा मृत्यू

बीड, (प्रतिनिधी):- गर्भपात करण्यासाठी वारंवार होणार्‍या छळाला कंटाळून एका ३४ वर्षीय विवाहितेने जाळून घेतले होते. आज पहाटे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
माजलगाव तालुक्यातील तेलगाव येथील पुजा मनोहर निवळे (३४) ही दोन महिन्याची गर्भवती होती. पती आणि सासु पोटातील गर्भ रिकामा कर असे म्हणून वारंवार त्रास देत होते. सततच्या त्रासाला कंटाळून दि.१६ एप्रिल रोजी पुजा निवळे यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत जाळून घेतले होते. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असतांना आज सकाळी तिचा मृत्यू झाला.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.