Add new comment

फळ व्यापारी अब्दुल सत्तार बागवान यांना पितृशोक

बीड, (प्रतिनिधी):- येथील नवी भाजीमंडईतील फळ व्यापारी अब्दुल सत्तार बागवान यांचे वडिल अब्दुल रज्जाक बागवान (लल्लूभाई) यांचे आज सकाळी र्‍हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी ते ६७ वर्षांचे होते. आज रात्री ८.३० वाजता (इशाच्या नमाजनंतर) त्यांचा तकिया कब्रस्तान येथे दफनविधी होणार आहे.
बीड येथील प्रसिद्ध फळ व्यापारी अब्दुल रज्जाक बागवान (लल्लूभाई) यांन आज सकाळी अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यातच र्‍हदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. आज रात्री इशाच्या नमाजनंतर तकिया मस्जिद परिसरातील कब्रस्तानमध्ये त्यांचा दफनविधी होणार आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, अब्दुल सत्तार, मजहर, अमजद ही तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बागवान कुटूंबियांच्या दु:खात सिटीझन परिवार सहभागी आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.