लाइव न्यूज़
गडकरींच्या भाषणाकडे जिल्ह्याचे लक्ष; होणार जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्नपुर्ती
बीड, (प्रतिनिधी):- साडे चार हजार कोटींच्या विकास कामाचे भुमिपुजन सोहळ्यासाठी केंद्रियमंत्री नितीन गडकरीसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंबाजोगाईत होत आहेत. लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांचे सहकारी राहिलेले गडकरी मुंडेंच्या जिल्ह्यात विकासाची गंगा वाहती करणार आहे. त्या अनुषंगाने दोघांच्या वित्रुष्टाला विकास कामाच्या माध्यमातून आहूती दिली जाणार आहे. लोकनेत्या ना.पंकजा मुंडे यांच्या चाणक्यनितीचा फायदा जिल्ह्याच्या विकासातून होणार आहे. वाघाळा येथे होणार्या विकास कामाच्या भुमिपुजनासह ना.नितीन गडकरी यांच्या भाषणाकडेही जिल्हाभराचे लक्ष लागले आहे.
बीड जिल्ह्यातील विविध भागातून जाणार्या साडे चार हजार कोटी खर्चाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे भुमिपुजन आज अंबा साखर परिसरातील वाघाळा येथे होणार आहे.या भुमिपुजन कार्यक्रमास केंद्रिय भुपृष्ठ वाहतुक, जहाज बांधणी, गंगा व जलसंधारण मंत्री नितीन गडकरीसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. बीड जिल्ह्याच्या विकासाला लोकनेत्या ना.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रोत्साहन मिळत असुन मागील नऊ वर्षाची दरी या माध्यमातून कमी होणार आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी थेट गडकरींना जिल्ह्यात घेऊन येण्यात ना.पंकजाताई मुंडे यांचा सिंहाचा वाटा आहे. वैयक्तीक हेवे-दावे न पाहता बीड जिल्ह्याच्या विकासाला महत्व देणार्या लोकनेत्या पंकजाताई ठरल्या आहे. दरम्यान वाघाळा येथे कार्यक्रमाची पुर्ण तयारी झाली असुन सभास्थळी ४ वाजेपर्यंत मंत्री महोदयांचे आगमन होणार आहे. मध्यंतरी निर्माण झालेल्या दरीमुळे गडकरी व बीड समीकरण काहीशे लांबले होते. मात्र जिल्ह्याच्या विकासासाठी सढळ हाताने मदत करत बीड जिल्ह्यावर आपले प्रेम आहे हे गडकरी यांनी दाखवून दिले आहे. स्व.मुंडे नंतर बीड जिल्ह्यात ना.गडकरी येत आहे. जिल्ह्यातील तमाम जनता गडकरी यासोहळ्यानिमित्त काय बोलणार? याकडे उत्सुकतेने पाहत आहे.
Add new comment