लाइव न्यूज़
हंगामी वस्तीगृहाचा निधी तात्काळ वर्ग करा आ.जयदत्त क्षीरसागरांची आढावा बैठकीत सूचना
Beed Citizen | Updated: April 20, 2018 - 3:43pm
बीड, (प्रतिनिधी):- ऊसतोड कामगांराच्या मुलांसाठी शासनामार्फत चालू केलेल्या ७० वस्तीगृहाचे १ कोटी ९० लक्ष ११५३४ रूपये अद्याप पर्यत वाटप करण्यात आले नाही. हा निधी कोणत्याही प्रकारची अर्थिक देवाण घेवाण न करता तात्काळ वर्ग करण्याच्या सूचना आ.जयदत्त क्षीरसागर यांनी अधिकार्यांच्या बैठकीत दिल्या आहेत.
आज शुक्रवार दि.२० रोजी सकाळी ११.०० वाजता शिक्षण विभाग, कृषि विभाग, प.स.पाणी पुरवठा विभाग, वन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांची आढावा बैठक घेण्यात आली. आ.जयदत्त क्षीरसागर यांनी यावेळी अधिकार्यांना प्रलंबीत कामे तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या. स्थलांतरीत ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी ७० वस्तीगृह उघडण्यात आले होते. या वस्तीगृहाचा १ कोटी ९० लक्ष ११५३४ रूपये निधी अद्याप पर्यत वर्ग करण्यात आला नाही. यावेळी बोलतांना ते म्हणाले की कोणत्याही प्रकारची अर्थिक देवाण-घेवाण न करता हा निधी तात्काळ वर्ग करावा तसेच ग्रामीण भागामध्ये जलयुक्त शिवारची कामे तात्काळ सुरू करून नविन ज्या नविन गावांची निवड करण्यात आली आहे त्या गावात ही कामे सुरू झाली पाहीजेत. पाणी टंचाई लक्षात घेवून पाणी पुरवठा पुर्ववत करण्यासाठी व दुरूस्ती करण्यासाठी तात्काळ पावले उचला. रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलाची संख्या वाढणार आहे त्यानुसार प्रत्येक गावातील प्रस्ताव तात्काळ दाखल करण्यात यावेत. वैयक्तीक व सार्वजनिक विहीरीसाठी निधी मागणीचे प्रस्ताव दाखल करून जुनी कामे व वैयक्तीक विहीरीची कामे तात्काळ सुरू करण्याच्या सूचना आ.क्षीरसागर यांनी संबंधीत अधिकार्यांना दिल्या आहेत. यावेळी संबंधीत विभागाचे वरिष्ठ व सहकारी अधिकारी उपस्थित होते.
Add new comment