Add new comment

बीडमधील गोंधळ भोवला; दोन पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल

बीड, (प्रतिनिधी):- येथील पोलिस मुख्यालयातील राखीव पोलिस निरिक्षक कक्षात मोटारसायकल घुसवून गोंधळ घालणार्‍या दोन पोलिस कर्मचार्‍याविरुद्ध दुपारी उशिरा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
बीड येथील पोलिस मुख्यालयात राखीव पोलिस निरिक्षक शेख गफ्फार यांचे कक्ष आहे. त्याठिकाणी पोलिस कर्मचारी सिद्धांत गोरे यांनी कक्षामध्ये मोटारसायकल घुसवून गोंधळ घातला होता. या प्रकरणाची माहिती कळताच पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांच्यासह  डीवायएसपी सुधीर खिरवडकर, पोनि.पाळवदे यांनी घटनास्थळी भेट देवून सीसीटीव्ही फुटेज पाहिले. सदरील प्रकरणानंतर दुपारी उशिरा पोनि.शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सिद्धांत गोरे यांच्यासह दुसर्‍या महिला पोलिस कर्मचारी रेखा गोरे या दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कलम ३४१, ३५३, २९४, ५०४, ५०६, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.