Add new comment

नगराध्यक्षांमुळे नवीन पाईपलाईनच्या कामाला सुरुवात नगरसेवक सय्यद इलियास यांच्या प्रयत्नांना यश

बीड, (प्रतिनिधी):- शहरातील इस्लामपुरा भागामध्ये नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली नवीन पाईप लाईनच्या कामाला सुरुवात झाली आहे. नगरसेवक सय्यद इलियास यांच्या प्रयत्नांना  यश आले असुन गेल्या अनेक महिन्यांपासुन सदरील कामाविषयी त्यांचा पाठपुरावा सुरु होता.
बीड येथील इस्लामपुरा भागामध्ये नवीन पाईपलाईनच्या कामाला आजपासुन सुरुवात झाली. या कामामुळे गजानन नगर, राजू बेकरी परिसर, गोशेनशीन दर्गाह परिसर व महंमदीया मस्जिद परिसरसह आदि भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. आज सकाळी या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. यावेळी नगरसेवक सय्यद इलियास, सिटीझनचे पत्रकार शेख जकीयोद्दीन सह नगरपालिकेतील कर्मचारी व भागातील नागरिक उपस्थित होते.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.