लाइव न्यूज़
मा.न्यायालय व राज्य माहिती आयोग नगर परिषदेच्या भ्रष्टाचार्यावर कार्यवाहीच्या तयारीत- शेख निजाम
बीड, (प्रतिनिधी):- बीड नगर परिषदेमध्ये ३० ते ४० वर्षापासून क्षीरसागर कुटुंबियाची सत्ता आहे. सदरील लोकांनी जनतेने दिलेल्या सत्तेचा उपयोग त्यांनी लोकांची कामे न करता, स्वत:च्या फायद्याची कामे करून स्वत:ला मालामाल बनवून शहराला भिकारी बनवन्याचे काम केले आहे. शासनाच्या वेगवेगळ्या योजना फक्त कागदावर दाखवून त्याचा निधी गडप केला. त्यांनी आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून कोठ्यावधी रूपयांची मालमत्ता जमवली आहे व आपल्या गैरकृत्यामध्ये सहाय्य करण्यासाठी आपल्या मर्जीतल्या अधिकारी व कर्मचारी यांना नेमलेले असून सदर झालेल्या भ्रष्टाचारा विरोधात बीड नगर परिषदेमधील बांधकाम विभाग, विद्युत विभाग, नगर रचना विभाग या विभागातील वेगवेगळ्या माहिती करिता माहितीच्या अधिकाराखाली शेख निजाम यांनी अर्ज सादर केला होता. परंतू बीड नगर परिषदेच्या भ्रष्टाचारी परंपरेप्रमाणे याबाबत कोणतीही माहिती पुरवण्यात आलेली नाही. सदरील माहिी मुदतीत उपलब्ध न करता, बीड नगर परिषदेच्या सत्ताधार्यांच्या इशार्यावरून बीड नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचार्यांनी सदर अर्ज मोगम कारण देऊन निकाली काढले. या विरोधात शेख निजाम यांनी मा.उच्च न्यायालय खंडपिठ औरंगाबाद येथे रिटपिटीशन क्रमांक ७२६/१८, ७२७/१८, ७२८/१८, ७२९/१८ अन्वये दाद मागितली. यावर मा.उच्च न्यायालयाचे आदेश पारित झाले व त्यावर राज्य महिती आयोग येथे सुनावणी होऊन सदरील माहिती विनामुल्य व तात्काळ उपलब्द करून देणे बाबत आदेश पारित झालेले असून मा.न्यायालयाने या विलंबाबत व काम चुकारपणाबाबत बीड नगर परिषदे मधील संबंधीत सर्व अधिकारी व कर्मचार्यावंर शिस्तभंगाची कार्यवाही करणे बाबत सुचना दिलेल्या आहेत.
मा.न्यायालयाच्या या आदेशामुळे बीड नगर परिषद मधील भ्रष्टाचार्यांमध्ये खळबळ उडालेली असूनपुर्वी जे बीड नगर परिषदेमध्ये लोकांना माहिती देण्यास टाळाटाळ व्हायची ती आता दुर झालेली असून बीड नगर परिषदेमध्ये कामचुकार व भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांनी या निर्णयामुळे मोठा चाप बसलेला असून माहितीच्या अधिकारी माहिती मिळवून भ्रष्टाचार्यावर कार्यवाहीकरणे आता सोपे होणार आहे. त्यामुळे बीड नगर परिषदेमधील भ्रष्ट अधिकारी व कर्मचार्यांना भ्रष्टाचाराचा पापाचा घडा लवकरच फुटणार आहे असे शेख निजाम जैनुद्दीन यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या सर्वप्रकरणाची बाजु शेख निजाम यांच्यावतीने मा.उच्च न्यायाय खंडपीठ औरंगाबाद येथील प्रसिध्द विधीज्ञ एच.व्ही.तुंगार यांनी मांडली आहे.
Add new comment