विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी आरोपींना सक्त मजुरीची शिक्षा
बीड, (प्रतिनिधी):- सासरच्या लोकांकडून होणार्या त्रासाला कंटाळून विवाहितेने जाळून घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी न्यायालयाने आरोपींना सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. बीड येथील जिल्हा सत्र न्यायालयातील तिसरे अप्पर जिल्हा न्यायाधीश यु.टी.पौळ यांनी हा निकाल दिला आहे. शासनाच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील ए.जी.धस यांनी बाजू मांडली.
आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी येथील स्वाती बडे हिने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले होते. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असतांना दि.१६ मार्च २०१७ रोजी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी सासरच्या मंडळीविरुद्ध अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील तपासानंतर दोषारोपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. बीड येथील तिसरे अप्पर जिल्हा न्यायाधीश यु.टी.पौळ यांच्यासमोर सुनावणी झाली. सदर प्रकरणामध्ये आरोपींना न्यायालयाने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील ऍड.ए.जी.धसे यांनी काम पाहिले.
Add new comment