निळं वादळ!

बीड, (प्रतिनिधी):- राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आज सकाळी लाखोंचा जनसमुदाय एकत्र आला होता. मध्यरात्री जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांच्या हस्ते समता ज्योत काढून अभिवादन करण्यात आले तर सकाळी जय भिमचा नारा देत लाखोंच्या जनसमुदायाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. जिल्हाभरात सर्वत्र निळं वादळ पहायला मिळाले. ठिकठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी लाखोंच्या जनसमुदायाने येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. येथील आंबेडकर चौकामध्ये पहाटेपासुनच गर्दी झाली होती. हातात निळे झेंडे आणि जयभिमचा नारा देत तरुणांनी शहरातून रॅली काढली. पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांनी समता ज्योत काढून आंबेडकरांना अभिवादन केले. खा.प्रितमताई मुंडे यांनी परळीमध्ये अभिवादन करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या. बीड येथे आ.विनायक मेटे, नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, पप्पु कागदे,  योगेश क्षीरसागर, संदिप क्षीरसागर, ऍड.सुभाष राऊत, माजी आ.राजेंद्र जगताप, चंद्रकांत नवले, प्रभाकर कोलंगडे, अशोक लोढा, गणेश वाघमारे, विकास जोगदंड, एम.डी.विद्यागर, भारत सोन्नर, दिलीप भोसले, अनिल तुरुकमारे, डॉ.इद्रिस हाश्मी, राजेंद्र बांगर, सुशिलाताई मोराळे आदिंसह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.