खा.प्रितम मुंडेंसह आमदार, पदाधिकार्यांचा अन्नत्याग
बीड, (प्रतिनिधी):- संसदीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण केल्याने आज सत्ताधारी भाजपच्या वतीने दिल्लीपासून गल्लीपर्यंत लाक्षणिक उपोषण केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाचे पालन करीत येथील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोरही या लाक्षणिक उपोषणास सुरवात झाली आहे. खा.डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासह आमदार आणि पदाधिकार्यांनी जिल्हा कचेरीसमोर उपोषण सुरू केले आहे.
विरोधकांनी सलग २३ दिवस संसदीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याने उपोषण करून निषेध केला जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आज पंतप्रधान स्व:ता दिल्ली येथे तर भाजपाचे अध्यक्ष अमीत शहा कर्नाटकमध्ये उपोषण करीत आहेत. जिल्हा प्रमुखांपासून त्या-त्या विभागातील खासदार यांनीही उपोषणात सहभागी होऊन जनतेपर्यंत सत्य पोहचिवण्याचे आदेश वरीष्ठांकडून देण्यात आले होते. यानिमित्ताने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांशी संवादही साधला होता. त्या अनुशंगानेच जिल्हास्तरावर उपोषणाची जय्यत तयारी केल्याचे दिसून येत आहे. खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासह जिल्हा प्रमुख रमेश पोकळे, आ. संगीता ठोंबरे, जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार, जि.प. सभापती संतोष हांगे, सर्जेराव तांदळे, राणा डोईफोडे, मुन्ना हजारे, लक्ष्मण जाधव, संगिता धसे यांच्यासह पदाधिकार्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शिवाय विरोधकांच्या भूमिकेविरोधात येथे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली.
Add new comment