घरकुलाच्या अर्जाची मूदत वाढवा :बाबा चंदन मूदतवाढ देणार- नगराध्यक्षा अर्चना राळेभात

जामखेड, (प्रतिनिधी):-पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकूलासाठी जामखेड नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आपल्याला घरकुल मिळणार अशा अपेक्षेने नागरिक आपले रोजंदारीचे काम सोडून घरकूलासाठी लागणारे कागदपत्रे गोळा करण्यासाठी धावपळ करतांना दिसत आहेत. कोठेही एका चक्कर मध्ये काम होत नाही. नगरपरिषदेने सदर घरकूलाचे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल घोषित केली आहे मात्र दि १४ व १५ एप्रिल यादिवशी अनुक्रमे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती व रविवार असल्याने शासकीय कार्यालयांना सूट्टी आहे अशावेळी घरकूलाचे अर्धवट अवस्थेत असणारे अर्ज कसे दाखल करण्यासाठी नागरिकांना मोठी अडचण निर्माण होते आहे यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका संपर्कप्रमुख बाबा चंदन यांनी मूख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे सदर घरकुल च्या लाभापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी अर्ज दाखल करण्याची जास्तीत जास्त मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे.
नगरपरिषदेचे नगराध्यक्षांशी  संपर्क साधला असता त्यांनी शनिवार रविवार सूट्टी च्या दिवशी घरकुलाच्या अर्जासाठी नगरपरिषद कार्यालय चालू राहील परंतु  आतापर्यंत चार हजार अर्ज नागरिकांनी घेऊन गेले असून फक्त दिड हजार अर्ज भरून दाखल केले गेले आहेत उर्वरित अर्जाच्या कागदपत्राच्या पूर्ततेसाठी नागरिकांची धावपळ चालू आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मूदत वाढ देण्यासंबधी बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असे नगराध्यक्षा अर्चना राळेभात यांनी सांगितले.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.