लाइव न्यूज़
रेल्वे सबस्टेशनचे खरे श्रेय कृती समितीलाच राहणार-खुर्शीद आलम
Beed Citizen | Updated: April 13, 2018 - 3:01pm
बीड, (प्रतिनिधी):- बीडच्या रेल्वे प्रश्नाचे श्रेय पालकमंत्री आणि खासदार घेत असले तरी नागरिक आंदोलनाच्या रेट्यामुळेच गती मिळाल्याचे माजी नगरसेवक खुर्शीद आलम यांनी पत्रकात म्हटले आहे. सबस्टेशनचे श्रेय देखील कृती समितीलाच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असुन मुख्य रेल्वेस्थानक पालवन रोडवर होत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
बीड येथील रेल्वे मार्गाच्या प्रश्नासंबंधी माजी नगरसेवक खुर्शीद आलम यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, बीडच्या रेल्वे मार्गाचे श्रेय पालकमंत्री व खासदार घेत असले तरी वास्तविक पाहता नागरिक आंदोलनाच्या रेट्यामुळेच या प्रश्नाला गती मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. बार्शीनाका येथे सब रेल्वेस्टेशन होत असुन त्याचे श्रेय देखील कृती समितीला राहणार असुन माझ्यासह गंमतभाऊ, सुशिला मोराळे, मोईन मास्टर, स्वप्निल गलधर, जयसिंग चुंगडे, शफीक शेख, अजिंक्य चांदणे, जलील टेलर, नामदेव दुधाळ, सलिम जहॉंगीर, निजाम ाई, संजय उडाण, आदित्य सारडा, सुनिल सुरवसे, अशोक वाघमारे, सुनिल महाकुंडे, मोमीज ईशान, सुधीर भांडवले, मोमीन शाहबाज, सतिष जाधव, रवि शेरकर, जावेद कुरेशी, मोमीन रेहान व इतर सर्व नागरिकांना जात असल्याचे खुर्शीद आलम यांनी म्हटले आहे.
Add new comment