एमआयडीसीने नवीन जागा अधिग्रहण करावी -आ.मेटे
बीड (प्रतिनिधी): बीड शहरात होवु घातलेला रेल्वे मार्ग व राष्ट्रीय महामार्गांची निर्मीती या मुळे जिल्हयात आता नवीन उद्योग निर्मीतीसाठी पुरक वातावरण निर्माण होवु लागले आहे. वाढत्या बेरोजगारीला आळा घालण्यासाठी व जिल्हयातील गरीबीचे निर्मुलन करण्यासाठी उद्योग धंदयांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. जिल्हयाच्या विकासात अर्थपूर्ण भर घालण्यासाठी एम.आय.डी.सी.चे विस्तारीकरण करावे व यासाठी एम.आय.डी.सी.ने किमान २०० हेक्टर नवीन जागा अधिग्रहण करावी अशी मागणी शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी राज्याचे उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांच्याकडे मागणी केली आहे.
बीड जिल्हा हा अतिशय मागासलेला व दुष्काळ ग्रस्त आहे. जिल्हयात मोठया प्रमाणावर उद्योगधंदे नसल्याने बेरोजगारी निर्माण झालेली आहे. लक्षणीय वाढलेली बेरोजगारी लक्षात घेता बेकार युवकांच्या हाताला काम देण्याची नितांत गरज आहे. मागील काळात बीड येथे एम.आय.डी.सी. कडे जमीन होती. परंतू या जमीनीवर सध्या उद्योगा ऐवजी घरांचे प्रमाण वाढल्यामुळे येथे नविन उद्योग उभारण्या करिता जमीन उपलब्ध नाही. या मुळे अनेक नुतन उद्योजकांची मागणी असुनही जागा उपलब्ध नाही. या करिता एम.आय.डी.सी.ने नवीन जागा अधिग्रहण करणे बाबतचे लेखी पत्र आ. विनायक मेटे यांनी ना. सुभाष देसाई यांना दिले आहे.
Add new comment