लाइव न्यूज़
बन्सीधर नगर मधील जलकुंभाचे डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्या हस्ते भुमिपुजन
बीड, (प्रतिनिधी):- अमृत अटल योजनेतर्ंगत सुरु असलेल्या जलकुंभ व पाईपलाईन कामापैकी बन्सीधर नगर येथील जलकुंभाच्या बांधकामाचे भुमिपुजन आज नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. या जलकुंभाची क्षमता १४.२० लक्ष लिटरची आहे. यामुळे शाहूनगर परिसरातील या भागाचा पाणीप्रश्न मिटणार आहे.
बीड शहरात अमृत अटल योजनेतर्ंगत सध्या विविध ठिकाणी जनतेच्या मागणीवरुन जलकुंभ व पाईपलाईनचे काम सुरु आहे. शाहूनगर भागातील पिंपरगव्हाण रोड लगत असलेल्या बन्सीधर नगर भागात १४.२० लक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्यात येणार आहे. आज नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्या हस्ते जलकुंभाचे भुमिपुजन करण्यात आले. यावेळी जेष्ठ नेते वशिष्ट नवले, नगरसेवक भास्कर जाधव, शिवशंकर गाडे, लक्ष्मण हातवटे, घोडके, विकास शिंदे, राजेंद्र देशमुख, विठ्ठल मातकर, लक्ष्मीकांत सर्वज्ञ, शेख शाकेर, गिरीष देशपांडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Add new comment