लाइव न्यूज़
पत्रकारांच्यावतीने प्रशासनाला निवेदन
Beed Citizen | Updated: April 14, 2018 - 3:18pm
बीड, (प्रतिनिधी):- बातमी छापली म्हणून गुन्हा दाखल करुन लेखणीची मुस्कटदाबी करणार्या पोलिस प्रशासनाच्या निषेध नोंदवून पत्रकारांनी आज अप्पर पोलिस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर व अप्पर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांना निवेदन दिले आहे. सदरील गुन्हा मागे घ्यावे अशी एकमुखी मागणी पत्रकारांच्यावतीने करण्यात आली.
वाहतुक पोलिसांच्या विरोधात बातमी छापल्याप्रकरणी संपादक, कार्यकारी संपादक, वार्ताहर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्या प्रकरणी जिल्हाभरातील पत्रकारांनी निषेध नोंदवला आहे. आज सकाळी पत्रकारांच्यावतीने अप्पर पोलिस अधिक्षक वैभव कलुबर्मे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. सदरील गुन्हा मागे घ्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर अप्पर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनाही निवेदन देण्यात आले असुन सदरील कारवाई हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी असुन त्यातून एक प्रकारे पत्रकारांची मुस्कटदाबी होत असल्याचे नमुद करत सदरील गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी एकमुखी मागणी करण्यात आली. यावेळी संपादक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Add new comment