बीडमध्ये मंगळवारी मुकमोर्चा सर्व धर्मिय नोंदवणार निषेध

बीड, (प्रतिनिधी):- जम्मू काश्मिरमधील आठ वर्षीय आसिफावर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली तर उन्नावमध्येही एका दलित महिलेवर अत्याचार करण्यात आला. या घटनेचा निषेध नोंदवत मंगळवार दि.१६ एप्रिल रोजी बीडमध्ये मुकमोर्चा काढण्याचा एकमुखी निर्णय मुस्लिम समाजाच्यावतीने आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या मुकमोर्चामध्ये सर्व धर्मीय नागरिक सहभागी होणार आहेत.
बीड येथील तकीया मस्जिद येथे आज दुपारी मुफ्ती आरेफसहाब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुफ्ती अब्दुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये जम्मू-काश्मिरमधील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली तर उन्नावमध्येही एका दलित महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली. या दोन्ही घटनांचा निषेध नोंदवून दोषींवर कडक कारवाई करावी. जम्मू-काश्मिरमधील अत्याचार व हत्या प्रकरणात आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चा काढून त्यामध्ये सहभागी होणार्‍यांना सहआरोपी करावे या मागणीसाठी मंगळवार दि.१६ एप्रिल रोजी बीडमध्ये मुकमोर्चा काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सदरील मुकमोर्चा सकाळी ११ वाजता किल्ला मैदान येथून कारंजा-राजुरीवेस-बशिरगंज चौक-छत्रपती शिवाजी महाराज चौक-नगर रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. लोकशाही मार्गाने मुकमोर्चा काढून दोन्ही घटनांचा निषेध नोंदवत प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे. या मुकमोर्चामध्ये सर्व धर्मियांचा सहभाग असणार आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.