आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून 1 कोटी 30 लक्ष रूपयांच्या कामांना मंजूरी
बीड दि.13 (प्रतिनिधी)ः- मतदरसंघातील सामाजिक समतोल लक्षात घेऊन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी 13 गावातील कामांना मंजूरी करून घेतली आहे. यापैकी 7 गावात सामाजिक सभागृह, पाणी पुरवठा आणि रस्ते सुधारणा करण्यासाठी 1 कोटी 30 लक्ष रूपये शासनाकडून निधी प्राप्त होणार आहे. मंजूर झालेल्या कामांमुळे नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.
बीड मतदारसंघातील विकास कामांचा पाठपुरावा करत असताना आ.जयदत्त क्षीरसागर यांनी प्रयत्न करून बीड विधानसभा क्षेत्रातील विकास कामासाठी 1 कोटी 30 लक्ष रूपये निधी मंजूर करून घेतला असून यामध्ये आहेर वडगाव या ठिकाणी रांजवण वस्तीमध्ये 5 लक्ष रूपये सामाजिक सभागृह, काठोडा येथील हनुमान मंदीर परिसरात 10 लक्ष रूपयांचे सामाजिक सभागृह, मौजे पाली येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये 10 लक्ष रूपयांचे सामाजिक सभागृह, जांब येथील महादेव मंदीर परिसरात सामाजिक सभागृह 10 लक्ष रूपये, वरवटी, ईट व मोरगाव येथील सामाजिक सभागृहासाठी प्रत्येकी 5 लक्ष रूपये तर आनंदवाडी (चव्हाणवाडी) ता.शिरूर येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेसाठी 15 लक्ष रूपये मंजूर झाले आहेत. दहीफळ ते दर्गा, समनापूर जोड रस्ता यासाठी 20 लक्ष रूपये, बीड पोलीस कॉलनीतील रस्ता करण्यासाठी 15 लक्ष रूपये तर पोखरी ते पोखरी तांडा या रस्त्याच्या सुधारणेसाठी 15 लक्ष रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. आ.क्षीरसागर यांनी सामाजिक समतोल राखून सर्व समाजासाठी ही कामे शासनाकडून मंजूर करून घेतली असून मागासवर्गीय समाज, मुस्लीम समाज व बहूजन समाजासाठी बीड येथील पोलीस कर्मचारी वसाहतीसाठी आवश्यक असणारा रस्ता मंजूर झाल्यामुळे येथील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Add new comment