केंद्र व राज्य सरकारच्या नाकर्ते पणाच्या विरोधात मोर्चा मध्ये सहभागी व्हा-फारोख पटेल
केंद्र व राज्य सरकार बलात्काऱ्यांना पाठीशी घालते परंतु देशातील जनता जम्मू काश्मीर व उत्तर प्रदेश मध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणा बाबत बीजेपी सरकार वर चोही बाजूनी हल्ले करत आहे . या दोन्ही घटनांचा संताप व्यक्त करत आहेत या दोन्ही घटना एका मागोमाग एक समोर आल्या असून या दोन्ही घटनांनी देशातील जनताच नव्हे तर सर्व जग हादरले आहे बलात्कारासारख्या गंभीर गुन्हा असताना आरोपीना पाठीशी घालण्याचे काम केंद्र व राज्य शासनाने केले आहे आणि केंद्रात व राज्यात भाजप चे सरकार आल्या पासून महिला व बालिका वर अत्याचार,बलात्कार च्या प्रकरनात वाढ झाली असून दुर्दैवाने केंद्र व राज्य सरकार महिलांच्या सुरक्षे साठी ठोस पावले उचलत नाहीत महिला व बालिका वर अत्याचारात वाढ झाली आहे या निषेधार्थ बीड मध्ये सर्व पक्षीय मुख मोर्चाचे आयोजन केले असून या या मूक मोर्चा मध्ये आपन लाखो च्या संख्येने उपस्थित राहावे हा मोर्चा दिनांक 17/04/18 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता किल्ला मैदान येथून निघणार असून या मोर्चा मध्ये विविध पक्ष,सामाजिक संघटना,पत्रकार,वकील,शिक्षक, डाँक्टर यांची उपस्थिती राहणार आहे
Add new comment