लाइव न्यूज़
माझी अटकच बेकायदेशीर- छगन भुजबळ; न्यायासाठी सुप्रीम कोर्टात धाव, आज सुनावणी
मुंबई, (प्रतिनधी):-मला झालेली अटक ही बेकायदेशीर आहे.तसेच नियमाचे उल्लंघन करणारी आहे,असे सांगत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.छगन भुजबळ यांच्या याचिकेवर आज दुपारी सुनावणी होणार आहे.त्यामुळे सुप्रीम कोर्ट तरी भुजबळांना दिलासा देणार का याकडे लक्ष लागले आहे.
छगन भुजबळ यांना मनी लॉंड्रिंग व भ्रष्टाचारप्रकरणी विविध गुन्ह्यांतर्गत अटक झाली आहे.त्यांच्यासोबत त्यांचे पुतणे व माजी खासदार समीर भुजबळ यांनाही तुरूंगात डांबले आहे.हे चुलते-पुतणे गेली दोन वर्षापासून तुरूंगात आहेत.मात्र,ईडी अथवा इतर तपास यंत्रणांना अद्याप भुजबळांविरोधात आरोप सिद्ध करता आलेले नाहीत.मात्र,त्यांना ईडी व मुंबई हायकोर्टाने वारंवार जामिन मंजूर करण्यास विरोध केल्याचे दिसून आले आहे.अखेर भुजबळ यांनी आपली अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.आज दुपारी सुप्रीम कोर्टातील कोर्ट क्रमांक ७ मध्ये भुजबळांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
Add new comment