वाहतुक शाखेचे पोनि.बुधवंत यांची कारवाई; ५८ दुचाकी संशयास्पद आढळल्या
बीड, (प्रतिनिधी):- येथील वाहतुक शाखेने चोरीच्या मोटारसायकलींचा छडा लावण्याच्या उद्देशाने दोन महिन्यांपासुन तपासणी मोहिम हाती घेतली आहे. रस्त्यावरील मोटारसायकलींना थांबवून त्यांच्याकडे कागदपत्रांची विचारणा केली जात आहे. दोन महिन्यांमध्ये साडे आठ हजार मोटार सायकलींची तपासणी करण्यात आली असुन त्यामध्ये ५८ दुचाकी संशयास्पदरित्या त्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यातील एक गाडी चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान तपासणीच्या दृष्टीने सदरील मोहिम राबविण्यात आलेली असुन वाहनधारकांनी कागदपत्र दाखवून सहकार्य करावे असे आवाहन वाहतुक शाखेचे पोनि.सुरेश बुधवंत यांनी केले आहे.
बीडमध्ये वाहतुक शाखेच्या कर्मचार्यांनी मोटारसायकलींची तपासणी हाती घेतली आहे. फेब्रुवारीपासुन सुरु असलेल्या मोहिमेतर्ंगत त्या महिन्यात ३४३६ तर मार्चमध्ये ५२०० मोटारसायकलींची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ५८ दुचाकी संशयास्पदरित्या आढळून आल्याने त्या गाड्या संबंधित ठाण्याच्या आवारामध्ये आहेत. अद्यापही त्यांची कागदपत्रे सादर झालेली नाही. ५८ पैकी १ गाडी चोरीचे असल्याचे आढळून आले असुन संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चोरीच्या गाड्यांचा तपास लागावा या उद्देशाने ही मोहिम राबविण्यात आलेली असुन वाहनधारकांनी घरातून बाहेर पडतांना गाडीचे कागदपत्र सोबत ठेवावीत असे आवाहन पोनि.सुरेश बुधवंत यांनी केले आहे.
Add new comment